E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरातील १३६ इमारती धोकादायक
Wrutuja pandharpure
24 May 2025
महापालिकेने केलेल्या पाहणीतून बाब उघड
पुणे
: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे, जुन्या वाड्यांचे पाहणी केली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या हद्दीत १३६ इमारती धोकादायक आहेत. त्यातील १०३ इमारती अतिधोकादायक असून, राहण्यास योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक जुने वाडे, इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला जातो. त्यानुसार महापालिकेतर्फे ही पाहणी करण्यात आली. यात १३६ इमारती धोकादायक आणि त्यापैकी १०३ इमारती अथवा जुने वाडे अतिधोकादायक आढळले. त्या इमारती अथवा त्यातील धोकादायक भाग उतरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत अनेक ठिकाणी जुने वाडे आणि इमारती आहेत. त्यांचे मालक व भाडेकरूंमध्ये वादविवाद असून, काही ठिकाणी मालकांमध्येही वाद आहेत. यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी कोणीही राहात नाहीत. त्यांची देखभाल, दुरुस्तीही होत नाही. त्यामुळे हे जुने वाडे-इमारती अधिकच खिळखिळ्या होत आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेकडून दर वर्षी अशा मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार या मिळकतींचे अतिधोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक असे वर्गीकरण केले जाते. त्यात अतिधोकादायक इमारती अथवा वाडे उतरवले जातात. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. काही वेळा मिळकतधारकांकडून कारवाईला विरोध होतो. असे मिळकतधारक पालिकेच्या विरोधात न्यायालयात जातात. यात न्यायालयाने स्थगिती दिल्यास पालिकेला कारवाई थांबवावी लागते. जिथे दुरुस्ती शक्य आहे, तिथे तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या जातात. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती झाली की नाही, याची पडताळणीही केली जाते.
अतिधोकादायक ७७ ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य
महापालिकेने केलेल्या पाहणीत १०३ अतिधोकादायक इमारती अथवा जुन्या वाड्यांमधील ७७ ठिकाणी सध्या नागरिक राहत आहेत. या वाड्यांना महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या (कलम १६० (ब) व (क)) अंतर्गत नोटीस बजावून या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आतापर्यंत पाच वाडे उतरवले आहेत. २३ ठिकाणी तातडीने आवश्यक देखभाल दुरुस्ती करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
Related
Articles
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
02 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
गुंड गजा मारणेच्या साथीदाराच्या पोलिस कोठडीत वाढ
04 Jun 2025
नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार
05 Jun 2025
मेधा पाटकर यांना ओडिशातील रायगडामध्ये जाण्यापासून रोखले
06 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर